Israel Hamas War  | माणुसकीला काळीमा! बाप-लेकाने केला इस्रायली महिलेवर बलात्कार आणि हत्या, थरकाप उडवणारा VIDEO समोर | Navarashtra (नवराष्ट्र)

0
13
Israel Hamas War  | माणुसकीला काळीमा! बाप-लेकाने केला इस्रायली महिलेवर बलात्कार आणि हत्या, थरकाप उडवणारा VIDEO समोर | Navarashtra (नवराष्ट्र)


माणुसकीला काळीमा! बाप-लेकाने केला इस्रायली महिलेवर बलात्कार आणि हत्या, थरकाप उडवणारा VIDEO समोर

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना दिसून येत आहे. बाप आणि लेकाने एका इस्रायल महिलेवर अत्याचार केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान, माणुसकीला काळीमा फासणारे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ऑक्टोबर २०१६ रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यादरम्यान हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायली महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला. या व्हिडिओमध्ये हमास दहशतवादी बाप आणि लेकाने सामूहिक बलात्काराची कबुली देखील दिली आहे. दोघांनी एकाच महिलेल्या क्रूरतेची शिकार बनवले असल्याचे देखील म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये, हमासचा एक दहशतवादी आणि त्याचा मुलगा इस्रायली अधिकाऱ्यांना सांगतांना दिसत आहे की, 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यादरम्यान त्यांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली.

जमाल हुसेन अहमद रादी (४७) असे इस्रायली महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या हमास सेनानीचे नाव आहे. जमाल हुसैनचा १८ वर्षीय मुलगा अब्दुल्ला यानेही एका इस्रायली महिलेवर बलात्कार केला. ‘डेली मेल’च्या रिपोर्टनुसार, हमास सेनानी जमाल हुसैन यांनी सांगितले की, जेव्हा तो 7 ऑक्टोबर 2023 रोजी गाझा सीमेवरून किबुत्झ नीर या इस्रायली सीमा भागात प्रवेश केला. त्यावेळी त्याला एका घरातून रडण्याचा आवाज आला. जमाल म्हणाला- मला जे करायचे होते ते मी केले…मी तिच्यावर बलात्कार केला.





Source link