
23 लाख लोकसंख्या असलेल्या गाझामध्ये हवाई हल्ल्यांमुळे लोकांना घरे सोडावी लागली आहेत. आतापर्यंत 423,000 लोक विस्थापित झाले आहेत.
इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या सात दिवसांपासून युद्ध (Israel Hamas war) सुरू आहे. या युद्धात 1500 हून अधिक लोक मारले गेले आहेत. हमासच्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात मोठ्या संख्येने पॅलेस्टिनीही मारले गेले. इस्रायलने लष्कराने गाझा सीमेवर ताबा मिळवला आहे. इस्रायली हवाई दलाने गाझा पट्टीतील हमासच्या लक्ष्यांवर बॉम्बफेक सुरूच ठेवली आहे
हे सुद्धा वाचा
इस्रायलची गाझा पट्टीतील हमासवर बॉम्बफेक सुरू
इस्रायली हवाई दलाने गाझा पट्टीतील हमासच्या लक्ष्यांवर बॉम्बफेक सुरूच ठेवली आहे. इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझामध्ये आतापर्यंत 1537 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 6612 जण जखमी झाले आहेत. इस्रायलने गाझा पट्टीवर आतापर्यंत 6000 हून अधिक बॉम्ब टाकले आहेत. इस्रायलचा दावा आहे की त्यांनी हमासची 3600 हून अधिक लक्ष्ये नष्ट केली आहेत. इस्रायली लष्कराने गाझा पट्टीजवळ आपले रणगाडे तैनात केले आहेत. लष्कराने गाझा पट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना जागा रिकामी करण्याचा अल्टिमेटम दिला आहे









