
Happy Birthday Irrfan Khan: आपल्या दमदार अभिनयाने केवळ बॉलिवूडच नव्हे, तर हॉलिवूड देखील गाजवणारा अभिनेता इरफान खान याचा आज (७ जानेवारी) वाढदिवस आहे. आज अभिनेता या जगात नसला तरी त्याच्या आठवणी मात्र चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. इरफान खान याला या जगातून जाऊन आता तीन वर्ष झाली असली, तरी त्याच्या चित्रपटाच्या माध्यमातून तो अजरामर ठरला आहे.दिवंगत बॉलिवूड अभिनेता इरफान खानचा जन्म ७ जानेवारी १९६७ रोजी झाला होता. इरफान खानचे नाव अशा निवडक अभिनेत्यांमध्ये सामील आहे, ज्याने कुणाच्याही मदतीशिवाय मनोरंजन विश्वात आपले हक्काचे स्थान निर्माण केले होते. चला तर जाणून घेऊया त्याच्याबद्दल काही खास गोष्टी…






