Ira Khan Wedding: आमिर खानची लेक लग्न बंधनात अडकणार! आयराच्या विवाह सोहळ्याला झाली सुरुवात

0
22
Ira Khan Wedding: आमिर खानची लेक लग्न बंधनात अडकणार! आयराच्या विवाह सोहळ्याला झाली सुरुवात


Ira Khan-Nupur Shikhare Wedding: बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्ट’ अर्थात अभिनेता आमिर खान याची लाडकी लेक आयरा खान लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. आयरा खान फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. त्याच्या लग्न सोहळ्याला सुरुवात झाली असून, अनेक कलाकार या सोहळ्यांना हजेरी लावताना दिसत आहेत. आयारा खान आणि नुपूर शिखरे येत्या नव्या वर्षात म्हणजेच ३ जानेवारी २०२४ रोजी सात फेरे घेणार आहेत. दरम्यान आता त्यांच्या केळवण सोहळ्याला सुरुवात झाली आहे. नुकतंच त्यांचं केळवण अतिशय थाटामाटात पार पडलं आहे.



Source link