
Slogans for arvind kejriwal during ipl match : : अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यादरम्यान आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अरविन्द केजरिवाल यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल झिंदाबाद, ‘दिल्ली जीतेंगे, केजरीवाल जीतेंगे’, ‘जेल का जवाब, वोट से’ अशा घोषणा दिल्या. घोषणाबाजी करणाऱ्या तिघांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, त्यांचा घोषणाबाजी करणारा व्हिडिओ सोशल मिडियावर तूफान व्हायरल झाला आहे.







