
फलटण :- फलटण नगरपरिषदेची निवडणूक २०२५ जाहीर झाली असून, सोमवार दिनांक १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजे गटाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
या मुलाखतींचे आयोजन “गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स”, कोळकी (ता. फलटण) येथे करण्यात आले आहे. मुलाखती गुरुवार, ६ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होतील.
🗓️ मुलाखतींचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे :
गुरुवार, ६ नोव्हेंबर २०२५
- प्रभाग क्र. १ – सकाळी १० ते ११
- प्रभाग क्र. २ – सकाळी ११ ते १२
- प्रभाग क्र. ३ – दुपारी १२ ते १
- प्रभाग क्र. ४ – सायंकाळी ६ ते ७
- प्रभाग क्र. ५ – सायंकाळी ६ ते ७
- प्रभाग क्र. ६ – सायंकाळी ७ ते ८
शुक्रवार, ७ नोव्हेंबर २०२५
- प्रभाग क्र. ७ – सकाळी १० ते ११
- प्रभाग क्र. ८ – सकाळी ११ ते १२
- प्रभाग क्र. ९ – दुपारी १२ ते १
- प्रभाग क्र. १० – दुपारी १ ते २
- प्रभाग क्र. ११ – सायंकाळी ६ ते ७
- प्रभाग क्र. १२ – सायंकाळी ७ ते ८
- प्रभाग क्र. १३ – सायंकाळी ८ ते ९
राजे गटाच्या वतीने सर्व इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थक नागरिकांनी आपल्या समर्थकांसह वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.








