Inflation in India | अर्थमंत्रालयाच्या अहवालातून मोठा दावा; म्हटलंय, ‘सर्वसामान्यांना महागाईचा फटका नाहीच’ | Navarashtra (नवराष्ट्र)

0
16
Inflation in India | अर्थमंत्रालयाच्या अहवालातून मोठा दावा; म्हटलंय, ‘सर्वसामान्यांना महागाईचा फटका नाहीच’ | Navarashtra (नवराष्ट्र)


inflation

देशात यंदा मोसमी पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडेल, असे पूर्वानुमान आहे. यामुळे खाद्यवस्तूंची महागाई आगामी काळात कमी होईल, असा अंदाज केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या (Finance Ministry) मार्चच्या आर्थिक अहवालात वर्तवण्यात आला आहे.

नवी दिल्ली : देशात यंदा मोसमी पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडेल, असे पूर्वानुमान आहे. यामुळे खाद्यवस्तूंची महागाई आगामी काळात कमी होईल, असा अंदाज केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या (Finance Ministry) मार्चच्या आर्थिक अहवालात वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने सरासरीपेक्षा जास्त मोसमी पाऊल यंदा पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे कृषी उत्पादनात वाढ होणार असल्याने खाद्यवस्तूंची महागाई कमी होईल.

किरकोळ महागाई दरात आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये मोठी घट नोंदविण्यात आली असून, कोरोना संकटानंतरची नीचांकी पातळी त्याने गाठली आहे. याच वेळी खाद्यवस्तूंचा महागाई दर मार्चमध्ये 8.5 टक्क्यांवर आला आहे. त्याआधीच्या फेब्रुवारी महिन्यात तो 8.7 टक्के होता, असे टिपणाने नमूद केले आहे. चांगली आर्थिक कामगिरी आगामी काळात परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढणार असून, व्यापारी तूट कमी होणार आहे. यामुळे रुपयाच्या मूल्यात घसरण होणार नाही.






Source link