Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल होणार; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळत दिला दणका

0
12
Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल होणार; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळत दिला दणका


शिर्डीच्या ओझरमधील कार्यक्रमात बोलताना इंदुरीकर महाराज बोलताना म्हणाले होते की, सम तारखेला शारीरिक संबंध झाले तर मुलगा होतो आणि विषम तारखेला शारीरिक संबंध प्रस्थापित केले तर मुलगी होते, असं वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. त्यानंतर अनेक सामाजिक संघटना तसेच स्त्रिवादी कार्यकर्त्यांनी इंदुरीकर महाराज यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता. इंदुरीकर महाराज यांचं वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरातीला पाठिंबा देणारं असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर PCPNDT सल्लागार समितीने इंदुरीकर महाराज यांना नोटीस जारी करत कायदेशीर कारवाई कारवाई करण्याचे आदेश जारी केले होते. परंतु सत्र न्यायालयाने कारवाई करण्याचा आदेश देणारी नोटीस रद्द केली होती.



Source link