
इंडोनेशियातील माऊंट मेरापी येथे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर पांढरी आणि राखाडी राख पसरली आहे. काही गिर्यारोहक बेपत्ता असून या ज्वालामुखीच्या राख आजूबाजूची गावांमध्ये पसरली आहे..
इंडोनेशियामध्ये जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखीपैकी एक अशी ओळख असलेल्या पश्चिम सुमात्रा येथील माऊंट मेरापी येथे ज्वालामुखीचा उद्रेक (Mount Marapi volcano) झाला आहे. या उद्रेकात 11 गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मदत आणि बचाव पथकांनी आतापर्यंत सर्व 11 गिर्यारोहकांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. तर, ज्वालामुखीजवळ तीन गिर्यारोहक जिवंत सापडले असून अनेक गिर्यारोहक अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू असल्याचे बचाव अधिकाऱ्यांनी सांगितले. खबरदारी म्हणून आजूबाजूची गावे रिकामी करण्यात आली आहेत.
हे सुद्धा वाचा
शोध आणि बचाव संस्थेचे प्रमुख अब्दुल मलिक यांनी सांगितले की, त्यांना तीन लोक जिवंत आणि 11 मृतदेह सापडले आहेत. ते म्हणाले की, शनिवारी घटनेच्या दिवशी एकूण 75 गिर्यारोहक मेरापी पर्वतावर होते. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर पांढरी आणि राखाडी राख पसरली आहे. त्यामुळे गिर्यारोहक बेपत्ता असून आजूबाजूची गावे ज्वालामुखीच्या राखेने झाकली गेली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या ठिकाणाजवळ दोन पर्वत चढाईचे मार्ग आहेत, जे आता बंद करण्यात आले आहेत. तसेच, ज्वालामुखीच्या मुखापासून 3 किलोमीटरपर्यंत उतारावर असलेली गावे खबरदारीचा उपाय म्हणून रिकामी करण्यात आली आहेत. स्फोटानंतर ज्वालामुखीतून लाव्हा बाहेर येण्याची शक्यता आहे.









