
Pune To Ayodhya Special Trains: पुण्यातून उन्हाळी पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दरवर्षी मोठी असते. या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात भाविक अयोध्येला रामाच्या दर्शनासाठी जात आहेत. मात्र, अयोध्या येथे जाण्यासाठी मर्यादित गाड्या असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होत होती. पुण्यातील प्रवाशांना आयोध्येला जाता यावे यासाठी विशेष गाड्या असाव्या अशी मागणी प्रवाशांनी केली होती. या मागणीची दाखल घेत पुण्यातून अयोध्येला जाण्यासाठी ४ समर स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तीन आणि सात मे रोजी या विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे रामलल्ला दर्शनासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.







