
युक्रेन-रशिया युद्धात काही भारतीय अडकल्याची माहिती मिळाल्याचे सरकारने गेल्या महिन्यात म्हटले होते. मॉस्कोमधून त्याच्या सुटकेसाठी सरकार प्रयत्न करत आहे.
अनेकदा परदेशात फिरायला गेल्यावर काही कारणामुळे पर्यटकांना तिथंच अडकून पडावं लागल्याच्या घटना यापुर्वी उघडकीस आल्या आहेत. अशा परिस्थितीत या पर्यटक सरकारकडे मदतीची याचना करतात. सोशल मीडियावर व्हिडिओ, फोटो अपलोड करुन त्यांच्या परिस्थितीबद्दल सांगतात. सध्या इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही भारतीय तरुण भारत सरकारकडे मदतीचं आवाहन (Indian Boys Stuck In Russia) करताना दिसत आहे. या तरुणांनी त्यांची फसवणूक केली जात असून रशिया-युक्रेन युद्ध लढण्यास भाग पाडलं जात असल्याचा त्यांचा दावा आहे. नेमका काय प्रकार आहे पाहूया.
हे सुद्धा वाचा
नेमका प्रकार काय
सोशल मीडिया प्लॅटफार्म X वर एक 105 सेकंदाचा व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये लष्कराचे कपडे घातलेली सात मुले बंद खोलीत दिसत आहेत. भारतातून रशियात गेलेली ही मुलं तिथं अडकली असून त्यांची फसवणूक झाल्याचं सांगण्यात येत आहे. यातील गर्श नावाचा मुलगा हरियाणातील कर्नाल येथील रहिवासी असून तो एक व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे आणि त्याच्या परिस्थितीचं वर्णन करत आहे आणि सरकारकडे मदतीची याचना करताना दिसत आहे.










