
बदल घडण्याची वाट पाहू नका. जबाबदारी घ्या आणि बदल घडवा!
‘पुन्हा कर्तव्य आहे’ मधला आकाश म्हणजे अक्षय म्हात्रे म्हणतो की, ‘भारतात माझ्या डोळ्यासमोर मी जे बदल पाहिले आहेत, ते म्हणजे इंफ्रास्टकचरमध्ये विकास झाला आहे. माझ्या लहानपणी आमच्या घराच्या जवळ एकही मॉल नव्हता. पण, आता तीन मॉल आहेत, त्यासोबत मोठमोठे टॉवर, हायवेमध्ये विकास होताना पहिला आहे. मला जर आणखीन काही गोष्टींची प्रगती झालेली पाहायला आवडेल, ते म्हणजे रोजगार आणि व्यवसाय विभाग. आपल्या देशात व्यपार करणारे लोक अधिक वाढले पाहिजेत, ज्यामुळे नवीन रोजगार निर्मिती होईल. स्वातंत्र्यदिनानिमित्त मला सांगायला आवडेल की, जेव्हापासून सिनेमा पाहायला लागलो भगत सिंह आणि चंद्रशेखर आझाद यांच्या व्यक्तिमत्वाने मला प्रेरणा दिली आहे. जर मला कधी संधी मिळाली, तर या भूमिका साकारायला आवडेल. पुढच्या पिढीला एकच सल्ला आहे की, बदल घडवा, जागरूक राहा, जबाबदार रहा, मतदान करा, बदल घडण्याची वाट पाहू नका. जबाबदारी घ्या आणि बदल घडवा.’