Imran Khan | इम्रान खानचा पत्नी बुशरा बीबीसोबतचा विवाह न्यायलयानं ठरवला बेकायदेशीर, दोघांना सुनावली 7 वर्षांची शिक्षा! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
72
Imran Khan | इम्रान खानचा पत्नी बुशरा बीबीसोबतचा विवाह न्यायलयानं ठरवला बेकायदेशीर, दोघांना सुनावली 7 वर्षांची शिक्षा! | Navarashtra (नवराष्ट्र)


पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांचे लग्न बेकायदेशीर ठरवले आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan)  यांच्या अडचणी काही संपताना दिसत नाही आहे. आधीच तुरुंगात असलेले इम्रान खान यांना आणखी एक झटका बसला आहे. इम्रान खाना आणि त्यांची तिसरी पत्नी बुशरा बीबी (Bushara Bibi) यांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या दोघांनी निकाह केला होता. मात्र, न्यायालयाने दोघांचे लग्न बेकायदेशीर ठरवले आहे. हे लग्न बेकायदेशीर ठरवण्यात आले म्हणजे दोघांमध्ये निर्माण झालेले संबंधही बेकायदेशीर होते, त्यामुळे त्यांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकं प्रकरण काय

पाकिस्तानच्या एका न्यायालयाने शनिवारी हा निर्णय दिला. इम्रान खान आधीच तुरुंगात आहेत. इम्रान आणि त्याच्या पत्नीला सार्वत्रिक निवडणुकीच्या एक आठवडा आधी म्हणजे गैर-इस्लामिक विवाह केल्याबद्दल 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांनाही 5 लाख रुपयांचा (पाकिस्तानी) दंड ठोठावला आहे.






Source link