
इलियाना डिक्रूज हिने तिच्या इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोत लहान मुलाचे कपडे आहेत. या छोट्याशा ड्रेसवर लिहिले आहे की, ‘आता साहसी प्रवास सुरू होणार आहे.’ तर, यातील दुसऱ्या फोटोत तिच्या गळ्यातील क्युट लॉकेट आहे, ज्यावर ‘ममा’ असे लिहिले आहे. अभिनेत्री इलियाना डिक्रूझ हिने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘लवकरच येत आहे. माझ्या प्रिय बाळा, तुला भेटण्यासाठी आता मी फार काळ वाट पाहू शकत नाही.’






