Hyderabad | रेस्टॉरंटमध्ये मोफत हलीम खाण्यासाठी गेल्यावर मिळाला लाठ्यांचा मार, हैदराबादच्या रेस्टॉरंटमध्ये उडाल एकच गोंधळ! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
18
Hyderabad  | रेस्टॉरंटमध्ये मोफत हलीम खाण्यासाठी गेल्यावर मिळाला लाठ्यांचा मार, हैदराबादच्या रेस्टॉरंटमध्ये उडाल एकच गोंधळ! | Navarashtra (नवराष्ट्र)


मंगळवारी रमजानच्या पहिल्या उपवासानंतर हैदराबादमधील एका रेस्टॉरंटने मोफत हलीमची घोषणा केली. मोफत हलीम खाण्यासाठी जमलेल्या जमावामुळे गोंधळ उडाला. सुरक्षा दलांना लाठीचार्ज करावा लागला.

रमजान महिना (Ramdan) सुरु झाला असून मोठ्या प्रमाणावर लोकं उपवास करतात. मंगळवारी रमजानच्या पहिल्या दिवशी उपवास सोडल्यानंतर हैदराबादच्या एका रेस्टांरने मोफत हलीम देण्याचा निर्णय घेतला . याबाबत कळताच लोकांनी मोफत हलीम खाण्यासाठी मोठी गर्दी केली. पाहता पाहता ही गर्दी इतकी वाढली की तिथे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. या गर्दीचा सामना करण्यासाठी पोलिसांना पाचारण करावं लागलं. सुरुवातीला सुरक्षा दलांनी समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र गर्दी  नियंत्रणाबाहेर जात असल्यामुळे लोकांवर लाठीचार्ज करण्यात आला

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं

मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादच्या मलकपेठ येथील एका रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडली. रेस्टॉरंट व्यवस्थापनाने रमजानच्या पहिल्या दिवशी लोकांना मोफत हलीम देण्याचा निर्णय घेतला, परंतु गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. पीटीआय या वृत्तसंस्थेने आणखी एक व्हिडिओ जारी केला आहे. मोफत हलीमच्या शोधात शेकडो लोक रेस्टॉरंटच्या बाहेर जमलेले आहेत. ही घटना मध्यरात्रीनंतर 2 च्या सुमारास घडली.






Source link