
निंभोरे येथे भारतीय बौध्द महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन
फलटण : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने महामानव बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निंभोरे येथील अस्थींना श्रद्धापूर्वक वंदन करुन सूत्रपठनासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष आयु.महावीर भालेराव, सरचिटणीस आयु बाबासाहेब जगताप सर, कोषाध्यक्ष आयु.विठ्ठल निकाळजे सर, संस्कार सचिव आयु.बजरंग गायकवाड सर, तालुक्याचे प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष आयु.रामचंद्र मोरे, संघटक आनंद जगताप, अमोल काकडे, जेष्ठ प्रवचनकर सोमीनाथ घोरपडे सर, नंदकुमार निकाळजे, संगिता निकाळजे, धम्म उपासक अजय निकाळजे, विजय निकाळजे, आयुनि पारिजातका जगताप, आयुनि भाग्यश्री बजरंग गायकवाड, आयुनि भाग्यश्री विठ्ठल निकाळजे, आयुनि रजनी निकाळजे, निलाक्षी जगताप, तनिष्का जगताप, आरोही गायकवाड हे यावेळी उपस्थित होते.
यावेळी सकाळी भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा अंतर्गत बारामती तालुका व शहर शाखेच्या व भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या समता सैनिक दलाच्या वतीने महामानव बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना सलामी देण्यात आली. यामध्ये फलटण तालुका शाखेचे समता सैनिक दलाचे संरक्षण उपाध्यक्ष आयु. संपत भोसले यांच्या नेतृत्वाखाली सलामी देण्यात आली.
यावेळी संपूर्ण दिवसभर भारतीय बौद्ध महासभा शाखा बारामती तालुका शाखेचे अध्यक्ष भीमशाहिर आयु.पुण्यशील लोंढे यांनी भीम बुद्ध गीतातून वातावरण कृतज्ञतामय, धम्ममय केले. त्यांनी बुद्ध- भीम गीतातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले.
यावेळी बोलताना भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष आयु. महावीर भालेराव म्हणाले, निंभोरे या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी आहेत. हे एक ऊर्जेच्या केंद्र आहे. या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व महापरिनिर्वाण दिनानिमित्त BRA sport club Nimbhore यांच्या वतीने करण्यात येणारी व्यवस्था ही अतिशय चांगली व सुनियोजित होती. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंडळाच्या वतीने संपूर्ण काळजी घेतली गेली होती. येणाऱ्या काळातही मंडळासाठी लागणारे सहकार्य भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने देण्यात येईल.
यावेळी निंभोरे गावचे सरपंच आयु.नवनाथ कांबळे म्हणाले, “या ठिकाणी जागा अपुरी पडत आहे.थोडी गैरसोय जरी होत असली तरी येणाऱ्या काळामध्ये प्रशस्त असे बुद्ध विहाराचे निर्माण करण्याचा संकल्प आहे. आमच्या अगोदरच्या पिढीने, त्यानंतरच्या पिढीने आणि आमच्या पिढीने हा समृद्ध वारसा जपला व या आस्थीचे संरक्षण केले आहे. येणाऱ्या काळातही अस्थीचे जतन करण्याची जबाबदारी आमचे मंडळ सक्षमपणे पार पाडेल. मी तमाम आंबेडकरवादी कार्यकर्ते, बौद्ध उपासक उपासक, नेते सर्वांना विनंती करतो की सर्वांनी या कामांमध्ये सहकार्य करावे.”यावेळी मंडळाचे अध्यक्ष, कल्पेश कांबळे, रुपेश कांबळे, संकेत कांबळे व सर्व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. फलटण तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यांमधून व जिल्ह्यांमधून आज संपूर्ण दिवसभर हजारो लोकांनी निंभोरे या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींचे दर्शन घेऊन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमाची सांगता भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे सर्व पदाधिकारी व BRA sport club निंभोरे चे सर्व पदाधिकारी यांनी संयुक्तरीत्या सरणतंय घेऊन झाली.








