
हाजी वारीस अली शाह यांची समाधी त्यांचे हिंदू मित्र राजा पंचम सिंग यांनी बांधली असून ती बांधल्यापासून हे ठिकाण हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देत आहे.
रंगांनी भरलेला हा सण म्हणजे होळी. आपल्या देशात होळी (Holi 2023) वेगवेगळ्या पद्धतीने खेळली जाते. मथुरा, वृंदावन, बरसाना येथे साजरी होणारी होळी पाहण्यासाठी परदेशातूनही पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. लोक होळीला परस्पर बंधुभावाचा सण मानतात. या दिवशी लोक एकमेकांना मिठी मारून आणि एकमेकांचे अभिनंदन करून परस्पर द्वेष संपवतात आणि हीच पंरपरा बाराबांकी येथील प्रसिद्ध सुफी संत हाजी वारिस अली शाह यांच्या दर्ग्यावर (waris ali shah sharif dargah) अजुनही पाळली जाते. या दर्ग्यात हिंदू आणि मुस्लिम एकत्र होळी खेळतात. काय वेगळेपण आहे इथल्या होळीचं बघुया.
हे सुद्धा वाचा









