अकोला, 31 जुलै 2025 – विदर्भाच्या सहकार क्षेत्रात आज एक ऐतिहासिक क्षण घडला. तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि धनगर समाज संघटनेचे नेते श्याम भोंगे यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या उपसभापतीपदी शेतकरी पॅनलचे हरिदास वाघ यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीमुळे संपूर्ण अकोला जिल्हा आणि विदर्भातील वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांमध्ये तसेच धनगर समाजात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सहकार क्षेत्रात आजपर्यंत धनगर समाजाला बाजूला ठेवणाऱ्या प्रवाहाला छेद दत ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी ही संधी निर्माण करून एक नवा इतिहास घडवला आहे.
सभापती म्हणून निवड झाल्यानंतर तेल्हारा शहरात जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. या वेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, तालुकाध्यक्ष अशोक दारोकार, माजी सभापती सुनील इंगळे, संचालक मोहन पात्रीकर, गोपाल कोल्हे, श्रीकृष्ण जुमडे, सुमित गवारगुरु, संदीप गवई, श्रीकृष्ण वैतकार, रवि भाऊ भिसे, जीवन बोदडे, पंजाब तायडे, बाबूजी खोब्रागडे, मधुसूदन बरिंगे, रतन दांडगे, इद्रिस भाई यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी बोलताना नवनिर्वाचित सभापती श्याम भोंगे यांनी म्हटले की,
“ऍड. बाळासाहेब आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर यांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी कृतज्ञ आहे. सहकार क्षेत्रात आम्हाला प्रथमच प्रतिनिधित्व देण्यात आले, ही केवळ निवड नव्हे तर आमच्या अस्तित्वाची कबुली आहे.“