Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कच्या भरभराटीला ‘ट्रॅफिक जॅम’चा ब्रेक! ३७ आयटी कंपन्यांचे राज्याबाहेर स्थलांतर

0
13
Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कच्या भरभराटीला ‘ट्रॅफिक जॅम’चा ब्रेक! ३७ आयटी कंपन्यांचे राज्याबाहेर स्थलांतर


उद्धव ठाकरे यांची सरकारवर टीका

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क प्रकरणावर उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी या प्रकरणी पक्षाच्या ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे. घटनाबाह्य मिंधे सरकार दिल्लीची हुजरेगिरी करण्यात व्यस्त असताना, महाराष्ट्रातील हिंजवडी आयटी पार्कमधून तब्बल ३७ आयटी कंपन्या परराज्यात स्थलांतरित झाल्या आहेत. एका पाठोपाठ एक उद्योग महाराष्ट्राबाहेर जात असतानाही मिंधे सरकार हाताची घडी घालून स्वस्थ बसलंय. हा सरकारचा निव्वळ निष्क्रियपणा आहे. महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार फक्त सत्तेचा मलिदा खाण्यात मग्न आहे,असे ट्विटमध्ये म्हटले आहे.



Source link