Himachal Pradesh Rain | हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; तीन राष्ट्रीय महामार्गांसह 112 रस्तेही केले बंद | Navarashtra (नवराष्ट्र)

0
26
Himachal Pradesh Rain | हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; तीन राष्ट्रीय महामार्गांसह 112 रस्तेही केले बंद | Navarashtra (नवराष्ट्र)


हिमाचल प्रदेशमध्ये खराब हवामानामुळे तीन राष्ट्रीय महामार्गांसह 112 रस्ते बंद करण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत राज्यातील उंच डोंगर आणि आदिवासी भागात काही ठिकाणी हलकी बर्फवृष्टी झाली, तर विविध डोंगराळ भागात अधूनमधून पाऊस सुरू आहे.

शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये खराब हवामानामुळे तीन राष्ट्रीय महामार्गांसह 112 रस्ते बंद करण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत राज्यातील उंच डोंगर आणि आदिवासी भागात काही ठिकाणी हलकी बर्फवृष्टी झाली. तर विविध डोंगराळ भागात अधूनमधून पाऊस सुरू आहे. हवामान विभागानुसार, लाहौल आणि स्पितीच्या हंसा आणि कोकसरमध्ये अनुक्रमे पाच सेंटीमीटर आणि दोन सेंटीमीटर बर्फवृष्टी झाली.

हवामान खात्याने सांगितले की, ज्या भागात सर्वाधिक पाऊस झाला त्यात कोठी, चंबा, मनाली, जोत, डलहौसी, केलॉन्ग, कांगडा आणि कासोलचा समावेश आहे. शुक्रवारी राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो आणि ताशी 30-40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.






Source link