
Top 5 Highest Paying Jobs in India: अभ्यास पूर्ण केल्यानंतर प्रत्येकाला एक उत्तम नोकरी मिळवून भरपूर पैसे कमवायचे असतात. अनेकदा विद्यार्थ्यांना अशा कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा असतो जो पूर्ण केल्यानंतर त्यांना खूप जास्त पगाराची नोकरी मिळण्यास मदत होईल. चला तर मग आम्ही तुम्हाला भारतातील अशा नोकऱ्यांबद्दल सांगत आहोत ज्यामध्ये मिळणार पगार हा बाकीच्या पगारापेक्षा सर्वोत्तम आहेत. यानुसार तुम्ही तुमचे भविष्यातील करिअर सहज ठरवू शकता. S&P ग्लोबल रेटिंगनुसार, भारत 2027 पर्यंत जागतिक आर्थिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू शकतो, 2029 पर्यंत जर्मनी आणि जपानला मागे टाकत. अशा परिस्थितीत भारतातील नोकरीच्या जगातही मोठे बदल होत आहेत. चला अशा नोकरींबद्दल जाणून घेऊयात ज्यामध्ये तुम्हाला नोकरी मिळाली तर तुम्ही लॉटरी जिंकली आहे असे समजा.
1. आयटी डायरेक्टर
रिपोर्ट्सनुसार, भारतात सर्वाधिक पगाराची नोकरी ही आयटी डायरेक्टरची आहे. आयटी डायरेक्टर्सचे काम एखाद्या संस्थेच्या किंवा कंपनीच्या तांत्रिक प्रणाली आणि कामकाजावर देखरेख करणे आहे. आयटी डायरेक्टर होण्यासाठी, पदवीधराकडे कॉम्प्युटर सायन्स, आयटी, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि संबंधित क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक असते. मास्टर्स डिग्रीकेल्यानंतरही तुम्ही आयटी डायरेक्टर होऊ शकता. या जॉबच्या पगाराचे पॅकेज 14 लाख ते 99 लाख रुपये प्रति वर्ष असू शकते. मायक्रोसॉफ्ट, अॅपल, गुगल, अॅमेझॉन सारख्या कंपन्या आयटी डायरेक्टरची नियुक्ती करतात.
हे ही वाचा: ‘पुरुषांचाही विचार करा’ म्हणत TCS च्या मॅनेजरची आत्महत्या! बायकोच्या ‘त्या’ हट्टाने घेतला जीव
2. कमर्शियल पायलट
कमर्शियल पायलटची नोकरी ही सुद्धा भारतातील सर्वाधिक पगाराची नोकरी आहे. याचे काम अतिशय आव्हानात्मक आणि जोखमीचे आहे, म्हणूनच त्यांना या कामासाठी खूप कठोर प्रशिक्षण दिले जाते. सुरक्षित उड्डाणे उडवण्याची जबाबदारी कमर्शियल पायलटची असते. यामध्ये उड्डाणपूर्व तपासणी, उड्डाण नियोजन, नेव्हिगेशन, कम्युनिकेशन, लँडिंग आणि इतर अनेक कामांचा समावेश आहे. व्यावसायिक पायलटचे पगाराचे पॅकेज 1.1 लाख रुपये ते 84 लाख रुपये प्रति वर्ष असू शकते.
3. मॅनेजमेंट कन्सल्टन्ट
मॅनेजमेंट कन्सल्टन्ट या जॉबमध्ये कंपन्यांच्या बारीकसारीक समस्या समजून घेतल्यानंतर, कंपनी अधिक चांगले कसे कार्य करू शकते याबद्दल त्यांच्या सूचना देतात. यासाठी कोणत्याही विशेष पदवीची आवश्यकता नसते पण तुमच्याकडे व्यवसाय, व्यवस्थापन, अर्थशास्त्र, वित्त आणि इतर संबंधित क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक आहे. या नोकरीमध्ये वार्षिक पगार 6.6 लाख ते 42 लाखांपर्यंत असू मिळू शकतो.
4. प्रोडक्ट मॅनेजर
प्रोडक्ट मॅनेजर हे कोणत्याही उत्पादनाच्या कामावर देखरेख करतात. या जॉबसाठी मार्केटिंग, कॉम्प्युटर सायन्स, इंजिनीअरिंग आणि इतर संबंधित क्षेत्रातील पदवीधर असणे आवश्यक आहे. प्रोडक्ट मॅनेजरचा वार्षिक पगार 5.5 लाख ते 38 लाखांपर्यंत असतो.
5. इनव्हेसमेंट बँकर्स
ज्यांना पैशाशी संबंधित क्षेत्रात अधिक रस आहे त्यांच्यासाठी इनव्हेसमेंट बँकर्स हा एक चांगला करिअर पर्याय आहे. इनव्हेसमेंट बँकर्स हे कंपनीला वेगवेगळ्या स्त्रोतांकडून पैसे कमवण्याच्या कल्पना देतात. म्हणूनच त्यांना पैसेवाले असेही म्हणतात. इनव्हेसमेंट बँकर्सचा पगार वर्षाला 2 लाख ते 60 लाख रुपयांपर्यंत असतो.