
हरियाणात मंगळवार अचानक मोठी राजकीय उलथापालथ दिसून आली. तीन पक्ष आमदारांनी भाजप सरकारचा (haryana government) पाठिंबा मागे घेतला. यामध्ये पुंडरीतील आमदार रणधीर गोलन, नीलोखेडीचे धर्मपाल गोंदर आणि चरखी दादरीचे आमदार सोमवीर सांगवान यांचा समावेश आहे. या तिघांनी भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेत काँग्रेसला आपले समर्थन दिले आहे. त्यानंतर काँग्रेसने दावा केला की, बीजेपी सरकार अल्पमतात आले आहे. दुसरकीकडे भाजपने म्हटले आहे की, चिंतेचे कारण नाही.








