
स्टार प्रवाहवर १८ जुलैपासून सुरु होतेय नवी मालिका कुन्या राजाची गं तू रानी. डोंगरवाडी सारख्या छोट्याश्या खेडेगावात रहाणाऱ्या मात्र मोठी स्वप्न पहाणाऱ्या गुंजाची गोष्ट या मालिकेतून उलगडेल. गुंजा म्हणजे एक रानफळ. गुंजाचं झाड औषधी असतं, त्याचा पाला आपण गोड पानात खातो. गुंज्याची सगळी फळं वजनाला परफेक्ट एका भाराची असतात, म्हणून सोनं तोलत असताना ग्रामीण भागात आजही दोन गुंज, पाच गुंज सोनं असं म्हटलं जातं. रानातल्या या मौल्यवान फळावरुनच गुंजाला गुंजा हे नाव पडलं. अभिनेत्री शर्वरी जोग या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत झळकणार आहे.








