
Jau Bai Gavaat Hardeek Joshi: छोट्या पडद्यावर एका नवाकोरा अन् आगळावेगळा असा ‘जाऊ बाई गावात’ हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेता हार्दिक जोशीकडे सोपवण्यात आली आहे. हार्दिक एक सूत्रसंचालक म्हणून उत्तम भूमिका निभावतोय. पण त्याच्यासाठी ही संधी किती मोलाची आहे आणि काय शिकायला मिळाले हे त्याने स्वत: सांगितले आहे.






