Hardik Joshi: हार्दिक जोशी म्हणतोय, ‘काका मला वाचवा…’, काय आहे प्रकरण?

0
20
Hardik Joshi: हार्दिक जोशी म्हणतोय, ‘काका मला वाचवा…’, काय आहे प्रकरण?


अभिनेता हार्दिक जोशी आणि सुनील अभ्यंकर ‘लॉकडाऊन लग्न’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमोल कागणे प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती लक्ष्मण कागणे, अमोल कागणे, सागर पाठक यांनी केली आहे. सुमित संघमित्र यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे, तर अमोल गोळे यांनी चित्रपटाचे छायांकन केले आहे. चित्रपटाच्या नावातच लॉकडाऊन असल्यामुळे चित्रपटातून करोना काळातली गोष्ट दाखवली जाणार असल्याचे स्पष्ट होते. त्याशिवाय लग्नाशी संबंधित विषय असल्याने काहीतरी मजेदार पहायला मिळणार यात शंका नाही.



Source link