
8 फेब्रुवारी रोजी हल्द्वानीच्या बनफूलपुरा येथे कथित बेकायदेशीर मदरसा आणि मशीद पाडल्यामुळे प्रचंड हिंसाचार झाला होता.
हल्दवानी हिंसाचाराचा (Haldwani violence ) मुख्य सूत्रधार अब्दुल मलिक याला अटक करण्यात आली आहे. शनिवारी उत्तराखंड पोलिसांनी अब्दुल मलिकला दिल्लीत अटक केली. 8 फेब्रुवारी रोजी हल्द्वानीच्या बनफूलपुरा येथे कथित बेकायदेशीर मदरसा आणि मशीद पाडल्यामुळे प्रचंड हिंसाचार झाला होता. उत्तराखंड पोलिसांनी आरोपीला दिल्लीतून अटक केली. हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत सुमारे 80 जणांना अटक करण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा
मलिक अनेक प्रकरणांमध्ये आहे आरोपी
मिळालेल्या माहितीनुसार, हल्दवानी हिंसाचाराचा मास्टरमाईंड अब्दुल मलिक आणि त्याची पत्नी सफिया या सहा जणांमध्ये गुन्हेगारी कट रचल्याचा आणि बेकायदेशीर प्लॉटिंग, बांधकाम आणि जमीन हस्तांतरणासाठी मृत व्यक्तीच्या नावाचा वापर करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर गुन्हेगारी कट रचून दिशाभूल केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मलिक व इतरांनी खोट्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे जमिनी ताब्यात घेतल्या. मलिक यांच्यावर IPC कलम 120B (गुन्हेगारी कट), 417 (फसवणूक) आणि 420 (फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेचे वितरण) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









