
ज्ञानवापी प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. न्यायालयाने मुस्लिम पक्षाच्या पाच याचिका फेटाळल्या आहेत.
गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेला विषय म्हणजे ज्ञानवापी मशीद प्रकरण. (Gyanvyapi case) काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद यांच्यातील वादाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मोठा निकाल आला आहे. न्यायालयाने या प्रकरणातील मुस्लिम पक्षाच्या पाच याचिका फेटाळल्या आहेत, ज्यात टायटल दाव्याला आव्हान देणाऱ्या मुस्लिम बाजूच्या याचिकेचा समावेश आहे. न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
हे सुद्धा वाचा
नेमकं काय प्रकरण
मुस्लिम बाजूने हिंदू बाजूच्या 1991 च्या खटल्याला आव्हान देणार्या याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या, ज्या न्यायालयाने फेटाळल्या आहेत. अंजुमन इंतेजामिया कमिटी आणि यूपी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने 1991 मध्ये वाराणसी कोर्टात दाखल केलेल्या मूळ खटल्याच्या कायम ठेवण्याला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.







