
Guard Of Honour row in Punjab : अग्निवीर भरती अंतर्गत लष्करात भरती झालेल्या एका जवानाचा जम्मू-काश्मीरमधील सीमारेषेवर मृत्यू झाला. मात्र, अग्निवीर भरतीच्या नियमावलीनुसार या जवानास शहीद दर्जा देण्यात आला नाही. त्यामुळे, अंत्यसंस्कारावेळी गार्ड ऑफ ऑनर न देण्यात आल्याने यावर संबंधित जवानाच्या कुटुंबीयांनी नाराजी दर्शवली होती. हे प्रकरण पंजाबमध्ये चांगलेच चर्चिले गेले. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी देखील या प्रकरणी ट्विट केले होते. दरम्यान, वाद वाढल्यावर लष्कराने या प्रकरणी आपली बाजू स्पष्ट केली आहे.








