क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त फलटणमध्ये अभिवादन; मंत्री जयकुमार गोरे यांची उपस्थिती

0
2
क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त फलटणमध्ये अभिवादन; मंत्री जयकुमार गोरे यांची उपस्थिती

क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त फलटणमध्ये अभिवादन; मंत्री जयकुमार गोरे यांची उपस्थिती

फलटण :दि. ११ एप्रिल २०२६ रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी फलटण येथील महात्मा फुले चौकात भेट देऊन अभिवादन केले.
यावेळी मंत्री गोरे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या महान सामाजिक कार्याचे स्मरण केले. समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव करत, त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले.
अभिवादनप्रसंगी फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील तसेच फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला शहरातील अनेक नगरसेवक, नगरसेविका तसेच फलटण शहर व तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते.
महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार आणि त्यांच्या कार्यातून समाजाला दिशा देण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.