
Govinda-Krushna Abhishek Patch up: बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध अशी मामा-भाच्याची जोडी म्हणजे कृष्णा अभिषेक आणि गोविंदा. गेल्या अनेक वर्षांपासून दोघांमधील वाद बरेच चर्चेत आले होते. मात्र, आता त्यांचीतील हे वाद मिटल्याचे बोलले जात आहे. बॉलिवूडमध्ये एक काळ असाही होता, जेव्हा या मामा-भाच्यामध्ये खूप प्रेम होतं. दोघेही एकमेकांना सतत मदत करताना दिसायचे. गोविंदाने त्याचा भाचा कृष्णा याच्या करिअरमध्ये त्याला खूप मदत केल्याचेही बोलले जात होते. मात्र, काही वर्षांपूर्वी दोघांमधील मतभेदाची बातमी समोर आली आणि दोघांनीही एकमेकांशी बोलणे बंद केले होते. दोघांनी मीडियात एकमेकांविरोधात वक्तव्ये केली, जी प्रचंड गाजली होती. पण आता दोघांमध्ये सर्व काही ठीक असल्याचे बोलले जात आहे.







