Google Map : दिशा विचारली असता, गुगल मॅपने केली ‘फसवणूक’, महागडी एसयूव्ही कार कोसळली नदीत

0
17
Google Map : दिशा विचारली असता, गुगल मॅपने केली ‘फसवणूक’, महागडी एसयूव्ही कार कोसळली नदीत


Google Map viral news: दिशा आणि ठिकाण माहिती नसले की आपण गूगल मॅपचा आधार घेत असतो. अनोळखी आणि निर्जन रस्त्यावर गुगल मॅप खूप उपयुक्त ठरत असते. मात्र, हैदराबादमधील काही पर्यटकांना गूगल मॅपने दाखवलेला रस्ता हा चांगलाच अंगलट आणि महागात पडला आहे. गूगल मॅप दाखवत असलेला रस्ता फॉलो करतांना या पर्यंतकांची एसयूव्ही ही थेट नदीत कोसळली. केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील कुरुपंथारा भागात शनिवारी सकाळी ही घटना घडली. या कारमध्ये तीन पुरुष आणि एक महिला प्रवास करत होते. ते अलप्पुझा येथे जात होते.



Source link