
Golden Globe Awards 2024 Winners: यंदाच्या ८१व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांचे आयोजन अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे मोठ्या थाटात करण्यात आले आहे. चित्रपट विश्वातील हा प्रतिष्ठित ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार २०२४’ अमेरिकन स्टँड अप कॉमेडियन जॉय कॉय होस्ट करत आहे. या वर्षी ‘बार्बी’ आणि ‘ओपेनहायमर’ यांना गोल्डन ग्लोब पुरस्कारांच्या विविध श्रेणींमध्ये सर्वाधिक नामांकने मिळाली आहेत. तर, आता अभिनेते रॉबर्ट डाउनी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता-मोशन पिक्चर श्रेणीत ‘गोल्डन ग्लोब २०२४’ प्रदान करण्यात आला आहे. चला तर, पाहूया या पुरस्काराच्या विजेत्यांची यादी…








