Gold Price Today : दसऱ्यानंतर सोन्याचा दर घसरला, लक्ष्मीपूजनपर्यंत काय असणार सोन्याचा भाव

0
7
Gold Price Today : दसऱ्यानंतर सोन्याचा दर घसरला, लक्ष्मीपूजनपर्यंत काय असणार सोन्याचा भाव


सोन्याच्या किंमतीमध्ये सलग वाढ पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर दररोज नव नवे दराचे उच्चांक गाठत आहे. मात्र दसऱ्यानंतर सोन्याच्या दराला ब्रेक लागला आहे. दिवाळी अगोदर सोनं स्वस्त होतंय की काय? असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. गेल्या काही काळापासून सराफा व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारत होत असल्याचे दिसून आले. शहरांच्या विस्ताराबरोबरच पारंपरिक पेढ्यांचा शाखा विस्तारही होताना दिसत आहे.

Add Zee News as a Preferred Source

24 कॅरेट सोन्याचा दर 118830 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर देखील कमी झाला आहे. नवरात्र सुरु होण्याआधी सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली. महत्त्वाचं म्हणजे हा दर दररोज वाढतच होता. एवढंच नाही तर चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम 145610 पर्यंत वाढला. ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या मते, शुक्रवारी दिल्लीत सोन्याचा भाव चांगलाच घसरला. सोन्याप्रमाणेच, चांदीचा भाव देखील प्रति किलोग्रॅम ₹150000 पर्यंत घसरला. सोने आणि चांदीचे भाव देखील फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये त्यांच्या विक्रमी उच्चांकावरून घसरले.

आजचे सोने आणि चांदीचे दर खालीलप्रमाणे

24 कॅरेट सोने: प्रति 10 ग्रॅम 116954
23 कॅरेट सोने: प्रति 10 ग्रॅम 116486
22 कॅरेट सोने: प्रति 10 ग्रॅम 107130
18 कॅरेट सोने: प्रति 10 ग्रॅम 87613
14 कॅरेट सोने: प्रति 10 ग्रॅम 68418
चांदी 999: प्रति 10 किलोग्रॅम 145610

सोने आणि चांदीचे दर किती होते?

ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या मते, शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 500 रुपयांनी घसरून 118830 रुपयांवर आला. यामुळे सोन्याच्या किमतीतील पाच दिवसांच्या विक्रमी तेजीचा शेवट झाला. नफा वसुली आणि डॉलरमध्ये थोडीशी सुधारणा झाल्याने गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम झाला. 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या किमती ५०० रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 120600 रुपयांवर आल्या. त्याआधी, बुधवारी, ते 1100 रुपयांनी वाढून 121100रुपयांवर पोहोचले होते.

FAQ 

4ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईत सोन्याचा दर काय आहे?
24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹११,९४० आहे (१० ग्रॅमसाठी ₹१,१९,४००). २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹10945 आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹8955 आहे. हे दर हॉलमार्क्ड ज्वेलरीसाठी आहेत आणि मेकिंग चार्जेस वेगळे असतात.

22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्यामध्ये काय फरक आहे?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते आणि मुख्यतः गुंतवणुकीसाठी वापरले जाते. 22 कॅरेट सोने 91.6% शुद्ध असते आणि ज्वेलरी बनवण्यासाठी वापरले जाते, कारण ते तज्जेत्या मजबूत असते. ज्वेलरीमध्ये 22 कॅरेट अधिक सामान्य आहे.

सोन्याच्या किमतीवर काय परिणाम करतात?
आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमती (MCX इंडेक्स), डॉलरची मजबुती, चलन विनिमय दर, आयात शुल्क (12.5%), GST (3%), विवाह हंगाम आणि जागतिक घटना (जसे युद्ध किंवा महागाई) हे मुख्य घटक आहेत. मुंबईत स्थानिक मागणीमुळे किमती थोड्या जास्त असू शकतात.





Source link