Gold Price | सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सोन्याचा भाव घसरला, जाणून घ्या नवे दर | Navarashtra (नवराष्ट्र)

0
23
Gold Price | सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सोन्याचा भाव घसरला, जाणून घ्या नवे दर | Navarashtra (नवराष्ट्र)


सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सोन्याचा भाव घसरला, जाणून घ्या नवे दर

Gold Silver Price Today : तुम्ही जर सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसापासून सोन आणि चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशातच आज (8 जून) सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. भारतात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

सोन्याच्या दरात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 1900 रुपयांनी कमी होऊन 65,700 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आणि 22 कॅरेट सोन्याच्या 100 ग्रॅमचा भाव आज भारतात 19,000 रुपयांनी कमी झाला. 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव आज 2080 रुपयांनी घसरून 71,670 रुपयांवर आला आहे. त्याच वेळी, 24 कॅरेट सोन्याचा 100 ग्रॅमचा भाव 20,800 रुपयांनी घसरून 7,16,700 रुपयांवर आला. 18 कॅरेट सोन्याचा भाव आज 1550 रुपयांनी घसरून 53,760 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आणि शनिवारी भारतात 18 कॅरेट सोन्याचा 100 ग्रॅम 15,500 रुपयांनी स्वस्त होऊन 5,37,600 रुपयांवर आला.






Source link