
समोर आलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील आष्टी शहरात गौतमीचा डान्स कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. किरण गावडे या इसामाने पत्नी प्रगतीच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती. तसेच या कार्यक्रमाला भाजपा आमदार सुरेश धस यांनी देखील हजेरी लावली. सध्या बीडमध्ये या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा रंगली आहे.