
गौरी आणि शाहरुख यांची पहिली भेट एका मित्राच्या पार्टीत झाली होती. या पार्टीत आलेली गौरी अवघ्या १४ वर्षांची होती. तर, शाहरुख खान त्यावेळी १९ वर्षांचा होता. गौरीला पाहताच पहिल्याच नजरेत शाहरुख तिच्या प्रेमात पडला होता. याच वेळी त्याने लग्न करेन तर गौरीशीच असं मनाशी पक्कं केलं होतं. मात्र, त्यावेळी गौरीला आपल्या मनातील भावना सांगाव्या इतकं धैर्य त्याच्यात नव्हतं. मात्र, या पार्टीत त्यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं होतं. यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. जेएनयुमध्ये शिकत असताना देखील गौरी आणि शाहरुख यांच्या भेटीगाठी व्हायच्या. त्यावेळी शाहरुख खान गौरीसाठी इतिहासाच्या नोट्स काढायचा.






