Gashmeer Mahajani: वडील रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर गश्मीरची पोस्ट, ‘योग्य वेळ येईल तेव्हा…’

0
15
Gashmeer Mahajani: वडील रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर गश्मीरची पोस्ट, ‘योग्य वेळ येईल तेव्हा…’


अभिनेते रवींद्र महाजनी यांनी वयाच्या ७७व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. रवींद्र महाजनी हे गेल्या काही काळापासून आजारी होती. त्यांना अस्थमा आणि श्वसनाचा त्रास जाणवत होता. पुण्यातील तळेगाव दाभाडे परिसरातील एका बिल्डींगमध्ये ते भाड्याने राहत होते. पुण्यातील या घरात ते एकटेच राहत असल्याने त्यांचा फारसा कुणाशी संपर्क देखील नव्हता. मात्र, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्या बंद फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने बिल्डींगमधील रहिवाशांनी तातडीने तक्रार नोंदवली. या सोसायटीमधील रहिवाशांची तक्रार मिळताच पोलीस देखील तातडीने रवाना झाले. पोलिसांनी त्यांच्या या घराचा दरवाजा खोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद न आल्याने आणि सगळे प्रयत्न फोल ठरल्यानंतर पोलिसांनी हा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. पुढे तापसणी करत असताना पोलिसांना अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृतदेह आढळला.



Source link