Garlic Prices | लसणाचे दर पोहोचले 400 रुपये पार; शेतकऱ्याने शेतात लावले कॅमेरे अन् घरबसल्या ठेवतोय नजर | Navarashtra (नवराष्ट्र)

0
26
Garlic Prices | लसणाचे दर पोहोचले 400 रुपये पार; शेतकऱ्याने शेतात लावले कॅमेरे अन् घरबसल्या ठेवतोय नजर | Navarashtra (नवराष्ट्र)


लसणाचे दर पोहोचले 400 रुपये पार; शेतकऱ्याने शेतात लावले कॅमेरे अन् घरबसल्या ठेवतोय नजर

मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील लसूण उत्पादक शेतकरी सद्यस्थितीत खूश आहेत. कारण घाऊक व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतातून 300 रुपये किलो दराने लसूण खरेदी करत आहेत. हा लसूण बाजारात 400 रुपये किलोने विकला जात आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील लसूण उत्पादक शेतकरी सद्यस्थितीत खूश आहेत. कारण घाऊक व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतातून 300 रुपये किलो दराने लसूण खरेदी करत आहेत. हा लसूण बाजारात 400 रुपये किलोने विकला जात आहे. यावेळी शेतकऱ्यांना लसणापासून कोट्यवधी रुपयांचा फायदा होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून लसूण पिकावर लक्ष ठेवले आहे.

मजूर सीसीटीव्हीच्या माध्यमातून काम करताना दिसतात. लसूण महाग आहे. चोरीची भीती आहे. त्यामुळे कॅमेरे लावण्यात आले आहेत. आजकाल सोलर सीसीटीव्ही कॅमेरे आले आहेत. त्यासाठी वीजही लागत नाही, असे तरूण शेतकरी राहुल देशमुख याने सांगितले.






Source link