Ganesh Chaturthi: ‘दबंग’ सलमान खानच्या घरी का साजरा केला जातो गणेशोत्सव? कारण ऐकलंत का?

0
19
Ganesh Chaturthi: ‘दबंग’ सलमान खानच्या घरी का साजरा केला जातो गणेशोत्सव? कारण ऐकलंत का?


बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा आता सुपरस्टार असला तरी, त्याच्या कारकीर्दीत एक वेळ अशी आली होती, जेव्हा त्याला खूप मोठा तोटा सहन करावा लागला होता. एवढेच नाही तर, सलमान खानला या काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. या दरम्यान त्याच्या बहिणीने अर्पिता खान हिने गणपती बाप्पाची स्थापना करण्यास सुरुवात केली होती. खान कुटुंबात आणण्याची कल्पना सलमानची लाडकी बहीण अर्पिताची होती. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर सलमान खानला अचानक यश मिळू लागलं. एकीकडे सलमान खानची आई देखील गणेशभक्त होती. त्यानंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण खान कुटुंब एकत्र गणपती बाप्पाची आराधना करतील असे ठरले.



Source link