
सचिन हे मुंबईत वास्तव्य करत होते. तसेच तेथे ते सुतारकाम करून उदरनिर्वाह करत होते. गणेश उत्सवासाठी ते मुंबईहून गावी आले होते. गणेश चतुर्थी दिवशी ते सकाळपासून आनंदात व उत्साहत होते. घरातील सर्व तयारी करून गणेश मूर्ती आणायला गेले आणि गणपती मूर्ती घरात येताच त्यांना जीव गमवावा लागला. या घटनेने सुतार कुटूंबावर ऐन सणादिवशी दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घरातील उत्साही वातावरण क्षणात शोकाकूल बनले. सचिन यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. गणेश चतुर्थी दिवशी घडलेल्या या दु:खद घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.




