Gamma Knife Esprit | दक्षिण आशियातील पहिल्या गॅमा नाइफ एस्प्रिट या ब्रेन ट्यूमरवरील क्रांतिकारी उपचारपद्धतीचे अनावरण | Navarashtra (नवराष्ट्र)

0
24
Gamma Knife Esprit | दक्षिण आशियातील पहिल्या गॅमा नाइफ एस्प्रिट या ब्रेन ट्यूमरवरील क्रांतिकारी उपचारपद्धतीचे अनावरण | Navarashtra (नवराष्ट्र)


दक्षिण आशियातील पहिल्या गॅमा नाइफ एस्प्रिट या ब्रेन ट्यूमरवरील क्रांतिकारी उपचारपद्धतीचे अनावरण

शस्त्रक्रियेशिवाय पार पडणारी, वेदनारहित आणि अत्यंत अचूक अशी ही प्रक्रिया एका सेशनमध्ये पूर्ण होते आणि रुग्णाला त्याच दिवशी घरी जाता येते. या क्षेत्रातील सर्वोत्तम परिणाम असलेली सुवर्ण मानकप्राप्त ब्रेन सर्जरी

फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट गुरुग्राम : फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट दक्षिण आशियातील पहिल्या गॅमा नाइफ एस्प्रिटच्या उद्घाटनाची साभिमान घोषणा करत आहे. Leksell Gamma Knife® चा हा नवी वाट निर्माण करणारा प्रकार ब्रेन ट्यूमर्ससाठीच्या शस्त्रक्रियेविना पार पाडल्या जाणाऱ्या अत्यंत अचूक उपचार पद्धतीचे एक नवे यंत्र घेऊन आले आहे. ज्यामुळे घातक आणि अघातक अशा दोन्ही प्रकारच्या ट्यूमर्ससाठीच्या आणि मेंदूमधील इतर अपसामान्यतावरील उपचारांसाठी अधिक चांगला पर्याय मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा

गॅमा नाइफ कम्प्युटरच्या मार्गदर्शनानुसार ब्रेन ट्यूमरला प्रत्यक्ष न कापता अचूकपणे लक्ष्य करते. त्यामुळे मल्टिपल ब्रेन मेटास्टेसेस, मेनिन्जिओमाज, अकुस्टिक ट्यूमर्स आणि पिट्युटरी अडेनोमस यांच्यासह कर्करोगयुक्त घातक ट्यूमर्स आणि अघातक ट्यूमर्स दोहोंच्या उपचारांसाठी हा इष्टतम पर्याय ठरतो. या पद्धतीची अचूकता मेंदूच्या संवेदनशील किंवा पोहोचायला कठीण अशा भागांतल्या ट्यूमरचा वेध घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते आणि हे करताना मेंदूच्या निरोगी उती सुरक्षित राहतात आणि रुग्ण जवळ-जवळ तत्काळ आपल्या दैनंदिन कामांमध्ये परतू शकतो. आणखी एक गोष्ट म्हणजे मल्टिपल ब्रेन मेटस्टेटिससाठी रेडिएशन थेरपीची जवळजवळ ३० सेशन्स लागतात. याउलट गॅमा नाइफ रेडिओ सर्जरीमध्ये संपूर्ण ट्रीटमेंट केवळ एका सेशनमध्ये केली जाते आणि त्याच दिवशी रुग्णाला हॉस्पिटलमधून घरी सोडले जाते, ज्यामुळे ही पद्धती चपळाईने आणि तत्परतेने पूर्ण होते. इतकेच नव्हे तर मल्टिपल मेसास्टेटिसमध्ये कर्करोग कितीही प्रमाणात पसरला असला तरीही त्यावरील उपचार एका सत्रातच पूर्ण होतो. इतर तंत्रज्ञानांमध्ये हा फायदा मिळत नाही. पद्धतीमध्ये निरोगी उती रेडिएशनच्या संपर्कात येण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होते, ज्यामुळे हालचालींशी संबंधित प्रेरक चेतापेशी तसेच संवेदी चेतापेशी शाबूत राहतात. ज्यामुळे रुग्णाची तब्येत वेगाने पूर्ववत होते आणि उपचारांनतरच्या जीवनमानाच्या दर्जातही सुधारणा होते. म्हणूनच गॅमा नाइफ रेडिओसर्जरीला जगभरात मेंदूच्या रेडिओसर्जरींसाठीचे सुवर्ण मानक मानले जात आहे. रुग्णाला त्यांच्या व्यक्तिगत गरजेनुसार देखभाल मिळावी आणि उपचारांचा आरामदायी अनुभव मिळावा यासाठी ही प्रक्रिया एकतर फ्रेम-आधारित किंवा फ्रेमलेस पद्धतीने पार पाडली जाते आणि प्रक्रिया अचूकतेने पार पडली आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यासाठी प्रक्रिया पार पडल्यानंतर स्टीरिओटॅक्टिकएमआरआय केले जाते.






Source link