
गंगायन मोहिम लाईव्ह कुठे बघायची?
गगनयान मोहिमेची उड्डाण चाचणी २१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ७ ते ९ च्या दरम्यान श्रीहरिकोटा येथे होईल, अशी माहिती इस्त्रोने ट्विटरच्या माध्यमातून दिली. गगनयान चाचणी उड्डाण प्रक्षेपण डीडी न्यूज चॅनेल आणि इस्त्रोच्या अधिकृत वेबसाइट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपित केले जाईल. या मोहिमेद्वारे, शास्त्रज्ञांनी चालक दलाच्या सुरक्षेची खात्री करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यांना गगनयान मोहिमेदरम्यान एलव्हीएम-३ रॉकेटवरील क्रू मॉड्यूलमध्ये प्रत्यक्ष पाठवले जाईल.








