G7 Summit | पंतप्रधान मोदींचे इटलीत जंगी स्वागत; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबतही होणार चर्चा? | Navarashtra (नवराष्ट्र)

0
22
G7 Summit | पंतप्रधान मोदींचे इटलीत जंगी स्वागत; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबतही होणार चर्चा? | Navarashtra (नवराष्ट्र)


पंतप्रधान मोदींचे इटलीत जंगी स्वागत; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबतही होणार चर्चा?

इटलीला पोहोचताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. याच परिषदेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि पंतप्रधान मोदी या नेत्यांमध्ये भेट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वॉशिंग्टन : जागतिक स्तरावरील G7 शिखर परिषद इटली येथे होत आहे. या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे सहभागी होणार आहेत. ते इटलीला पोहोचताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. याच परिषदेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि पंतप्रधान मोदी या नेत्यांमध्ये भेट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत आपण या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीला पोहोचलो आहोत. जागतिक नेत्यांसोबत अर्थपूर्ण चर्चा करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. एकत्रितपणे, जागतिक आव्हाने सोडवणे आणि उज्वल भविष्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे हे आमचे ध्येय असल्याचेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच या परिषदेतच पंतप्रधान मोदी आणि जो बायडेन यांची भेट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.





Source link