
Fukrey 3 Star Cast Fees: मित्र-दोस्तांची यारीची कथा सांगणारा ‘फुकरे’ या चित्रपटाचा तिसरा भाग अर्थात ‘फुकरे ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळीही या चित्रपटाचे दिग्दर्शन मृगदीप सिंह लांबा यांनी केले असून, प्रेक्षकांना या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सध्या सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची हवा पाहायला मिळत आहे. अभिनेता पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मनजोत सिंह, पंकज त्रिपाठी आणि अभिनेत्री रिचा चड्ढा हे कलाकार ‘फुकरे ३’मध्ये दिसणार आहेत. या चित्रपटासाठी कलाकारांना देखील भरपूर मानधन दिले गेले आहे.








