
सध्याच्या घडीला सोशल मीडिया विश्वातील फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या माध्यमातून ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ पाठवून नवनवीन मित्रांच्या ओळखी करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. कधी कधी अशीच आलेली एखादी अनोळखी ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ व्यक्तीचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकू शकते. याच आशयाचं ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ हे नाटक आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकातून अभिनेते अजय पुरकर पुन्हा एकदा रंगभूमीवरून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. अभिनेते अजय पुरकर यांच्यासोबतच अभिनेता आशिष पवार, अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर, अभिनेते अतुल महाजन यांच्या या नाटकात मध्यवर्ती भूमिका आहेत.







