
परीक्षा नागपुरात आणि उत्तरे छत्रपती संभाजी नगरातून दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विनोद डोभाळ याला पोलिसांनी अटक केली आहे. शिवराणा करिअर अकॅडमीतून हे रॅकेट सक्रीय होते. यामध्ये विनोद डोभाळ, सचिन गोमलाडू यासह अन्य एक व्यक्ती हायटेक यंत्रणेद्वारे परीक्षार्थींना उत्तरे पुरवत होती. पोलिसांना याची गोपनीय माहिती मिळताच छापा टाकून एकाला अटक केली व सर्व सामान हस्तगत केले.




