FASTag News | तुमच्या वाहनावरही FASTag आहे ना? तर ‘हे’ नक्की करा अन्यथा FASTag च होईल रद्द | Navarashtra (नवराष्ट्र)

0
14
FASTag News | तुमच्या वाहनावरही FASTag आहे ना? तर ‘हे’ नक्की करा अन्यथा FASTag च होईल रद्द | Navarashtra (नवराष्ट्र)


तुमच्या वाहनावरही FASTag आहे ना? तर ‘हे’ नक्की करा अन्यथा FASTag च होईल रद्द

सध्या जवळपास सर्वच वाहनांवर FASTag लावल्याचे पाहिला मिळत आहे. पण आता ग्राहकांची ओळख पटवून देणारी प्रक्रिया अर्थात ‘केवायसी’ पूर्ण केलेली नसेल तर असे ‘फास्टॅग’ अकाऊंट 31 जानेवारीपासून बंद करण्यात यावीत, असे निर्देश भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) सोमवारी बँकांना दिले आहेत.

नवी दिल्ली : सध्या जवळपास सर्वच वाहनांवर FASTag लावल्याचे पाहिला मिळत आहे. पण आता ग्राहकांची ओळख पटवून देणारी प्रक्रिया अर्थात ‘केवायसी’ पूर्ण केलेली नसेल तर असे ‘फास्टॅग’ अकाऊंट 31 जानेवारीपासून बंद करण्यात यावीत, असे निर्देश भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) सोमवारी बँकांना दिले आहेत.

एनएचएआयनुसार, पथकर नाक्यांवरील पथकर संकलनाची व्यवस्था कार्यक्षम आणि जलद करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. एकाच फास्टॅगचा वापर वेगवेगळ्या वाहनांसाठी केला जातो. एका फास्टॅगचा वापर केवळ एकाच वाहनांसाठी व्हावा, या दृष्टीने ‘एक वाहन, एक फास्टॅग’ धोरण राबविले जात आहे. याचबरोबर रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्राहकांनी फास्टॅग संबंधाने ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.






Source link