
राजस्थानमधील भिलवाडा शहरात गुरुवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीमुळे भाजी मंडई बंद राहिल्याने शेतकरी संतप्त (Farmers Aggressive) झाले आणि त्यांनी भाजीपाला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.
भिलवाडा : राजस्थानमधील भिलवाडा शहरात गुरुवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीमुळे भाजी मंडई बंद राहिल्याने शेतकरी संतप्त (Farmers Aggressive) झाले आणि त्यांनी भाजीपाला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि मार्केट बंद करण्याबाबत प्रशासनाला प्रश्न विचारण्यात आले.
काही वेळातच शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला हिंसक वळण लागले. शेतकऱ्यांनी गाड्यांमधून भाजीपाला काढून जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यास सुरुवात केली. हे दृश्य पाहून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला आणि शेतकऱ्यांना तेथून पळवून लावले.








