
निवडुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक खोटे दावे केल्याच्या अनेक पोस्ट व्हायरल
भारतामध्ये १९ एप्रिल ते ०१ जून या कालावधीत सात टप्प्यांत मतदान होणार आहे , अशी घोषणा निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी केली. मात्र, तेव्हापासून सोशल मीडियावर अनेक खोटे दावे मेसेज व्हायरल होऊ लागले आहेत. यापूर्वी सोशल मीडियावर ‘चॅलेंज व्होट’ आणि ‘टेंडर्ड व्होट’बद्दल मॅसेज व्हायरल झाला होता. मतदार यादीत तुमचे नाव नसल्यास तुम्ही आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्राच्या आधारे कमल ४९ अंतर्गत चॅलेंज व्होट पर्यायाद्वारे मतदान करू शकतात, असा दावा व्हायरल मॅसेजमध्ये केला जात होता. मात्र, हा दावा खोटा आहे, अशी माहिती समोर आली.






