Fact Check: बीबीसीचा एक्झिट पोलचा व्हायरल व्हिडिओ हा २०२४ चा नाही तर २०१९ च्या निवडणुक निकालांचा; फॅक्ट चेकमध्ये उघड

0
9
Fact Check: बीबीसीचा एक्झिट पोलचा व्हायरल व्हिडिओ हा २०२४ चा नाही तर २०१९ च्या निवडणुक निकालांचा; फॅक्ट चेकमध्ये उघड


BBC Exit Poll Viral video fact check : लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार पडले असून सातवा आणि शेवटच्या टप्प्यासाठी लवकरच मतदान होणार आहे. दरम्यान, ४ जूनला निकाल लागणार आहे. निवडणुकीच्या या धामधुमीत ‘बीबीसी’चा एक व्हिडिओ. चांगलाच व्हायरल होतो आहे. बीबीसीने आपल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला ३४७ जागा आणि काँग्रेसला ८७ जागा दिल्याचे सांगितले आहे. व्हिडिओमध्ये एक न्यूज अँकर इंग्रजीमध्ये या जागांचे नंबर देताना दिसत आहे. सोशल मीडिया यूजर्सच्या मते हा ‘बीबीसी’चा एक्झिट पोल असून हा व्हिडीओवर राहुल गांधी यांच्या विरोधात एक पोस्ट देखील लिहिण्यात आली आहे. यात “सत्यनाश बीबीसी, राहुलला यांना स्वप्नातही पंतप्रधान होऊ देणार नाही, किमान ४ तारखे पर्यंत तरी त्यांना मजा करू दिली असतीस.” असे एकाने लिहिले आहे.



Source link